पिल्लांसाठी जीव झाडाले टांगला!

माणसाची वृत्ती, नेहमी तयार काही मिळत का? फुकट काही मिळत का? स्वस्त, कमी कष्टात काही मिळत का? अशी! परंतु ही चिमणाबाई, एव्हढे तयार घर सोडून लाकडाचे, प्लास्टिकचे, रेडीमेड आणलेले, घरी केलेले, तिला हे सर्व सोडून मनी प्लांट च्या दोन फांद्यांच्या मध्ये स्वतः घर तयार करायला कोणी सांगितले? माणूस काय म्हणेल " आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणून! " खरं विश्व तर यांच्यामुळेच निर्माण होते. कोणत्या शाळे जातात ही मंडळी स्वावलंबनाचे धडे गिरवायला? आणि अस कलाकुसरीने स्वतः चे घर उभे करायला? एवढासा जीव! हात नाहीत, दोनच पाय! फक्त चोचीने घरट तयार करणं सोपी का गोष्ट आहे ? त्यानंतर अंडी घालणं, ती उबविणे, त्यांचे कुत्र्या-मांजारापासून संरक्षण करणे, सोपी का गोष्ट आहे? माणसाच मूल जन्माला घालायचं, म्हणजे केव्हढा मोठा कार्यक्रम असतो? शिवाय तीच घरट वादळ, पाऊस याने उध्वस्त झालं तर ती आत्महत्या नाही करत, पुन्हा नव्याने घरट उभारते.  ' शिर सलामत तो पगडी पचास ' 
किती शिकण्यासारखे  एवढ्याशा जीवाकडून!  तिला कळत आपला फोटो नाही काढू द्यायचा कोणाला! ती भुर्रकन उडून गेली, आम्ही बाकी बदनामी होईपर्यंत रिल वर रिल बनवितो! 🐤🐣🐦‍⬛

Comments

Popular posts from this blog

जगन्नाथपुरी

हे (पोहणे) इतके अवघड असते ! भाग १

श्रद्धेचा बाजार आणि भोंदूगिरीचा विळखा: एक आत्मचिंतन"​(अशोक खरात व त्या सारख्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर)