महेश्वर टूर
एम एस जी कॉलेजची, बी कॉम -1983 ची बॅच म्हणजे भन्नाटच! त्यात वाडेकर साहेबांचे रोज भेटणारे मित्र म्हणजे सगळे उत्साह मूर्ती! ते सर्व रोज भेटतात आणि नेहमीच महिन्या दोन महिन्यात वेगवेगळ्या ट्रिप करत असतात, गेट टुगेदर करत असतात, मजा करत असतात. परंतु आम्ही त्यांच्या सहधर्मचारिणी कधीच त्यांच्या बरोबर ट्रिपला गेलो नव्हतो. आता आम्ही सर्वजणी सेवानिवृत्त झालो होतो आणि ठरवू लागलो होतो की, आपणही ह्यांच्यासारखेच कोठे तरी फिरायला जाऊ या! तरीही आमचे जाणे काही न काही कारणाने शक्य होत नव्हते आणि फक्त आम्ही स्त्रियांनीच कोठे जायचे, म्हणून हिंमतही होत नव्हती. काही कौटुंबिक जबाबदाऱ्याही नेहमीप्रमाणे सोबत होत्याच. बाई कधी रिटायर्ड होते का? कधीच नाही. त्यात संध्या आणि उज्ज्वलाचे गुढगे दुखत होते. त्यांना खूप चालणे, चढणे शक्य होणार नव्हते. भारतीच्या तीन महिन्यांपूर्वीच दोन स्टेन टाकल्या गेल्या होत्या. कल्पना आणि मी देखील खूपच strong होतो अस नव्हत. म्हणूनच आम्हाला आमच्यासाठी सोयीस्कर असा स्पॉट निवडणे भाग होते! शेवटी या पाच पांडवांच्या मदतीनेच, त्यांना आग्रह करून आम्...