Posts

चैत्र उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा

Image
23 डिसेंबर रोजी नाशिक येथे राहणाऱ्या, माझ्या वहिनीचा मला फोन आला, "माझ्या धुळे येथील मैत्रिणी आणि मी दिनांक 21 आणि 22 मार्च रोजी 'अनुभूती टूर्स अँड ट्रॅव्हल्स'  कडून 'चैत्र उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला' जात आहोत, तुम्ही येता का आमच्याबरोबर?" मला पर्यटन आवडते, हे तिला माहित होते आणि म्हणूनच तिने मला विचारले, मी ताबडतोब तिला होकार दिला. एवढ्या अगोदर, म्हणजे जवळ जवळ तीन महिने अगोदर नियोजन करणे आणि कोठे जाण्याची खात्री देणे, म्हणजे खरोखरच जोखीम होती. कारण माझी राजस्थानची टूर त्याच महिन्यात पूर्ण झाली होती आणि जानेवारी मध्ये लक्षद्वीपची टूर बुक केलेली होती. पण तरीही वहिनीच्या रूपाने, मला नर्मदा मैय्यानेच साद घातली होती, नर्मदा मैय्याच मला परिक्रमेसाठी बोलावत होती. आणि झालेही तसेच शेवटपर्यंत शारीरिक आणि मानसिक कष्ट उपसण्याची, थोडक्यात परिक्रमेसाठी चालण्याची सर्व ताकद नर्मदा मैय्यानेच मला दिली. तिच्याच आशीर्वादाने, अनुभूती टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मदतीने आणि इतर सर्व सोबत असणाऱ्या मैत्रिणींच्या सहकार्यामुळे तसेच वहिनीच्या साथीमुळे माझी ही परिक्रमा अतिशय उत्साहात, आन...

आमची पहिली अमेरिका वारी

Image
दि. २२/7/ 2019 ला येथील 2 वाजेच्या सुमारास आम्ही दोघे फिलाडेल्फियाच्या विमानतळा वर उतरलो. सर्व कागदपत्रे क्लिअर होते आणि सामानही मर्यादेत असल्यामुळे काहीही त्रास झाला नाही. विमानतळा वर घेण्यासाठी माझा मुलगा पारस आलेलाच होता, त्याला पाहताच आमचा प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळाला. रेल्वे वाहतूक काही अपरिहार्य कारणासाठी 2/3 दिवस बंद होती, त्यामुळे आम्ही बसनेच घरी येण्यासाठी निघालो. SEPTA कंपनी च्या ह्या बसेस! अतिशय चांगली सेवा! अपंग व्यक्तींसाठी किंवा वयस्कर व्यक्तींसाठी तर पावलागणिक काळजी घेतलेली दिसते. गाडीत चढायचे असो की crossing करायचे असो. प्रत्येक ठिकाणी wheel chair जाईलच अशी व्यवस्था केलेली. पायी चालणाऱ्या व्यक्तींसाठी पण नेहमीच प्राथमिकता देण्यात येते. कितीही मोठी गाडी असेल तरी पादचार्याला पूर्ण crossing करू दिल जात. पर्यटक आहात, म्हणून नजरानजर होताच hi!! Hellow!!! How are you? Enjoy!!!अस म्हटले जाते. Sorry आणि Thank you हे शब्द तर एव्हढ्या वेळा म्हटले जातात, की विचारायला च नको! कोणी शिवी दिली तरी ही माणसं Thank You म्हणतील की काय असं मला सहज वाटून गेलं. आम्ही आलो तेव्हा इकडे जरी उन्...

जगन्नाथपुरी

खूप वर्षांपासून आम्ही कोठे फिरायला गेलोच नव्हतो. LTS तर वर्षानुवर्षे घेतले गेले नव्हते. म्हणून न्यू इंडिया चे holiday home कोठे कोठे आहेत, ते प्रथम बघितले. कारण थोडा आराम पण हवा होता. ह्या वयामध्ये काहीतरी change म्हणून फिरायला जायचे आणि दमून थकून घरी यायचे कोणी सांगितले? मग जगन्नाथपुरीसाठी holiday home डिसेंबर महिन्यातच दिनांक  17 फेब्रुवारी  ते 20 फेब्रुवारी बुक केले होते. श्री सचिन जोशींकडून tour program आखून घेतला त्यांनी वैशनम चे टूर पॅकेज बुक करून दिले. तीन चार दिवसाची टूर सात रात्र आणि आठ दिवसात करायचे ठरविले . खूप घाई नाही गर्दी नाही. छोटे छोटे पण प्रेक्षणीय स्थळ सहज पाहून होतील काहीही सुटणार नाही.  परत काही ओडीसाला आता  जाणं होणार नव्हत. जातांना पुणे भुवनेश्वर flight  दिनांक 16 फेब्रुवारी चे book केले त्याचं तिकीट सहा साडे सहा हजार रुपये होत. पण तेच भुवनेश्वर पुणे मात्र दहा हजाराच्या वर होत. म्हणून येताना भुवनेश्वर मुंबई यायच अस ठरले. ते साधारण साडे आठ हजार रुपये पडले!  दिनांक 15 ला सकाळी नऊ वाजता आमच्या स्वतः च्या गाडीने TUV ने पुण्यासाठी निघालो. ...

रंगीला राजस्थान

Image
आजपर्यंत रंगीला राजस्थान विषयी खूप ऐकलेले होते, रेगीस्तान विषयी ऐकलेले होते. पराक्रमी महाराणाप्रताप आणि त्यांचा घोडा चेतक, हळदी घाटीचे युद्ध, जोहार पद्धत ह्यांच्याविषयी इतिहासात वाचलेले होते, थोडेफार दूरदर्शनवर बघितलेले होते. पण प्रत्यक्षात राजस्थानमध्ये जाऊन ते पाहण्याचा योग काही आजपर्यंत आलेला नव्हता. गत वर्षी माझ्या लहान सासूबाई आणि सासरे "महाले टूर्स" तर्फे राजस्थान टूर वर जाऊन आलेते आणि त्यांनीच आम्हाला त्यांच्या अनुभवावरून, "महाले टूर्स अँड ट्रॅव्हल्स" ह्यांची पर्यटनाच्या बाबतीत खूप चांगली सेवा आहे, असे सुचविले. म्हणून आम्ही ऑगस्ट 2025 मध्येच 20 नोहेंबर 2025 ची "रॉयल राजस्थान" ही त्यांची टूर बुक केली. या अगोदर आमचे राजस्थान मधील फक्त माऊंट अबू पाहून  झालेले होते. तेही 30/32 वर्षापूर्वी! बाकी राजस्थान मधील कोणतेच ठिकाण आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते. बारा दिवसांची टूर, थंडीचे दिवस!  त्यामुळे इतर कपड्यांबरोबर उबदार कपडे देखील जवळ ठेवणे आवश्यक होते. बॅग साधारण वीस किलो पर्यंत घ्यायच्या, असे महाले सरांनी सांगितलेले होते. पण ऐनवेळी असे काही ब...

नयनरम्य लक्षद्वीप

Image
रक्ताच नातं जसं एकमेकांना आकर्षित करत, त्याला भेटण्याची ओढ लागते, तसंच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक मैत्रीचं नातं जुळून येत. विचार जुळले की, एखाद्या चुंबकाप्रमाणे त्या व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात. वर्षानुवर्षे त्यांची भेट झाली नाही तरी प्रेम काही कमी होत नाही, ते वाढतच जात. सूर जुळतच जातात आणि मैत्रीचे थरावर थर चढून ते नात वृद्धिंगत होत जात. पुणे येथील स्मिता बुरांडेच आणि माझही असंच काहीस झालं. आम्ही दोघी आमच्या न्यू इंडिया च्या pre retirement च्या training ला तीन दिवस एकत्र आलो आणि जणू काही आमची फार पूर्वीपासून ओळख आहे अशी घट्ट मैत्री झाली. आम्ही दोघी मे महिन्यात रिटायर्ड झाल्यानंतर ती आणि तिचे यजमान सप्टेंबर महिन्यात, माझ्याकडे मालेगाव येथे आले आणि हे आमचे मैत्रीचे संबंध आमच्या दोघींपुरता मर्यादित न राहता त्याचे रूपांतर कौटुंबिक मित्रत्वात झाले. ही आमची मैत्री दृढ होण्यासाठी बुरांडे साहेबांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी प्रथम मालेगांवला येवून खऱ्या अर्थाने या आमच्या मैत्रीची जी पायवाट होती तिचा हमरस्ता तयार केला. मी पण आक्टोबर महिन्यात पुण्याला दिरांकडे आल्यानंतर स्मिताकडे गेले होत...